मुंबई / रमेश औताडे
मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने पार्किन्सन आजार ( चालताना अचानक अडथळा ) मध्ये नाविन्यपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रोजेक्टची घोषणा केली आहे. पार्किन्सन आजाराने पीडित रुग्णांना अनेकदा चालताना अचानक अडथळा जाणवतो किंवा चालणे सुरू ठेवणे कठीण होते. या स्थितीला रुग्ण त्यांचे पाय जमिनीला चिकटल्यासारखे वाटत असल्याचे सांगतात. यामुळे रुग्ण वारंवार पडतात असे डॉ. परेश दोशी* म्हणाले, “भारतात पार्किन्सन आजाराने पीडित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरीचे संचालक डॉ. परेश दोशी या उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. तसेच, फ्रान्समधील पॅरिस ब्रेन इन्स्टिट्यूटच्या फंक्शनल न्यूरोसर्जरीमधील जागतिक स्तरावर प्रख्यात तज्ज्ञ डॉ. कॅरीन कराची या देखील त्यांच्यासोबत या प्रोजेक्टमध्ये सामील होतील. जागतिक पार्किन्सन दिनानिमित्त या प्रोजेक्टची अधिकृत ओळख करून दिली जाईल. पॅरिस ब्रेन इन्स्टिट्यूटच्या डॉ. कॅरीन कराची* म्हणाल्या, “प्रोफेसर दोशी यांनी गेल्या ३० वर्षांत संकलित केलेला डेटा जगात अद्वितीय आहे.
पार्किन्सन हा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजार आहे आणि भारतात त्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यामुळे या आजारात लवकरात लवकर आणि अचूक उपचार मिळण्यासाठी आधुनिक साधनांची गरज अधोरेखित होत आहे. असे सीईओ जितेंद्र हरियाण म्हणाले.
००००००
