ठाणे : पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी जीवन चन्ने यांच्या पत्नी शारदा जीवन चन्ने यांचे सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्ष इतके होते.दिवगंत शारदा चन्ने यांचा स्वभाव अंत्यंत,प्रेमळ व मनमिळाऊ होता.त्यांच्या मितभाषी,स्वभावामुळे विविध समाजातील लोकांशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते.कुटूंबातील नातेवाईकांशी देखील त्यांनी जिव्हाळा जोपासला होता.दिवंगत शारदा चन्ने यांच्या पश्चात,पती जीवन चन्ने मुलगा डॉ मिलिंद,अजित, प्रशांत ही तीन मुलं,दोन मुली,सुना,नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने शहापूर तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे.शहापूर येथील गंगा देवस्थान येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कारावेळी शहापूर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तसेच शैक्षणिक,सामाजिक या विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
00000000
