राजेंद्र साळसकर
मुंबई:राजीव श्रीवास्तव हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्स (IRSE), १९९० बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक पदवी मिळवली असून, त्यांना भारतीय रेल्वे मध्ये ३४ वर्षांहून अधिक समृद्ध आणि विविध क्षेत्रांतील अनुभव आहे. आपल्या गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSUs) जसे की, उत्तर रेल्वे, रेल विकास निगम लिमिटेड, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर पश्चिम रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वे येथे अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून कार्यभार स्विकारण्यापूर्वी, श्रीवास्तव हे उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) म्हणून कार्यरत होते.
