अग्निशमन सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
कल्याण:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये २०० हुन अधिक सायकलिस्टने भाग घेतला. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरवात करण्यात आली.  १४ एप्रिल ते २० एप्रिल देशभर अग्निशमन सप्ताहाचं आयोजन केले जाते. केडीएमसी अग्निशमन दलाकडून सप्ताह साजरा केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.  रक्तदान शिबीर, सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना अपघात कसे टाळावे, आपत्कालीन परिस्थिती आली तर काय करावे याबाबत जनजागृती करण्यात आली.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *