कल्याण : मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे एक चाक रुळावरून घसरल्याची घटना सोमवारी सकाळी ८:०९ वाजता घडली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ पावले उचलून सुमारे ६० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने लोकलचे चाक पुन्हा रुळावर आणण्यात यश मिळवले. कोपर ते कल्याण दरम्यान ठप्प झालेली लोकल सेवा सकाळी १०:४५ वाजल्यापासून पुन्हा सुरू करण्यात आली.
डोंबिवली रेल्वे स्थानकावरती लोकांचा डब्बा घसरल्याने रेल्वे विस्कळीत झाली होती अखेर अडीच तासाच्या प्रयत्नानंतर लोकल रवाना कारण्यात आली मात्र एक नंबर प्लॅटफॉर्मच्या रेल्वे रूळ दुरुस्थीचे काम सुरु होते. सकाळच्या गर्दीच्या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकावर मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून कल्याणकडे जाणाऱ्या एका लोकल गाडीचे चाक रुळावरून घसरल्याची घटना घडली. या घटनेमुळे त्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या एकामागोमाग उभ्या राहिल्या होत्या, यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
घटनेनंतर तात्काळ रेल्वे प्रशासन आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होत, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. सकाळी ऑफिसच्या वेळेत हजारो प्रवाशांना उशीर होत असल्याने स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, काही स्लो लोकल गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून वळविण्यात आल्या, जेणेकरून सेवा काही प्रमाणात सुरळीत ठेवता येईल. तरीही लोकल गाड्यांचे वेळापत्रक मोठ्या प्रमाणावर बिघडले होते.
