जपानी J-स्लॅब तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर

मुंबई : मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ‘व्हायाडक्ट’वर ट्रॅक बसविण्याच्या कामाला वेग आला असून, जपानी ‘शिंकान्सेन’ तंत्रज्ञानावर आधारित J-स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक प्रणालीचा भारतात प्रथमच वापर होत आहे. ही प्रणाली RC ट्रॅक बेड, सिमेंट ॲस्फाल्ट मॉर्टार (CAM), प्रीकास्ट स्लॅब आणि फास्टनर्ससह रेल अशा चार घटकांवर आधारित आहे.

गुजरातमधील किम आणि आनंद येथे अत्याधुनिक ट्रॅक स्लॅब निर्मिती केंद्रे उभारण्यात आली असून, येथे तयार होणारे स्लॅब ट्रॅक कन्स्ट्रक्शन बेस (TCB) पर्यंत नेऊन बसवले जात आहेत. सध्या १० TCB कार्यरत असून, त्यापैकी ४ सुरत–बिलीमोरा–वापी आणि ६ वडोदरा–आनंद–अहमदाबाद दरम्यान आहेत.

प्रकल्पाची प्रगतीही लक्षणीय असून, सुमारे १८५ रूट किमीपर्यंत RC ट्रॅक बेड पूर्ण झाला आहे, तर ७० रूट किमीमध्ये ट्रॅक स्लॅब बसविणे आणि CAM इंजेक्शनचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रक्रिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने यंत्रीकृत पद्धतीने राबवली जात आहे.

फ्लॅश बट वेल्डिंग मशीन (FBWM) द्वारे रेल्स जोडून २०० मीटर लांबीचे पॅनेल तयार केले जातात, तर SLC आणि RFC यंत्रांच्या मदतीने स्लॅब व रेल अचूकपणे बसवले जातात. CAM कारद्वारे स्लॅब खाली मोर्टार इंजेक्ट करून ट्रॅकची अंतिम लाईन व लेव्हल निश्चित केली जाते.

या प्रकल्पामुळे देशात उच्च-वेग रेल्वे तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू होत असून, भविष्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *