मुंबई हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. परंतु रेल्वे स्थानकावर चढताना फलाट क्रमांक दोनच्या बाहेर वर चढताना मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.या परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असल्याने रेल्वे प्रवाशी हैराण झाले असून हा कचरा त्वरित उचलावा अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.
कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन हे हार्बर मार्गावरील प्रमुख रेल्वे स्टेशन असून या स्टेशन वरून रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. तसेच शालेय विद्यार्थी देखील याच रेल्वे स्थानकावरून शाळेमध्ये जाण्यासाठी ये जा करत असतात. परंतु सध्या या ठिकाणावरून कचऱ्यामुळे पुलावर चढणे फार त्रास दायक झाले आहे शिवाय कचऱ्यामुळे दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात पसरली असून स्थानिक रहिवासी आणि दुकानदार आजारी पडले आहेत. तरी हा कचरा त्वरित उचलावा अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहे.
कॉटन रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक दोनशे दिसेना मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार हा कचरा उचलण्यासाठी मी इलेक्ट्रिशनला पत्र दिले असून इथे दोन दिवसात हा सगळा कॅन्सर उचलला जाईल अशी माहिती स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर चढताना मोठ्या प्रमाणात कचरा साचल्या असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाले असून त्यानुसार आम्ही रेल्वे कर्मचाऱ्यांना हा कचरा उचलण्याबाबत आदेश दिले असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.
