आमदार प्रशांत ठाकूर यांची समिटला सदिच्छा भेट
नवी मुंबई : अशोक गायकवाड
नवीन मुंबई मधील यू बिझनेस मीट यांच्या वतीने आयोजित नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान व्यापार उद्योजकता वृद्धिंगत व्हावी या हेतूने या बेलापूरच्या दि पार्क हॉटेल मध्ये बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी या समिटला सदिच्छा भेट देऊन आयोजकांना आगामी वाटचाली करता शुभेच्छा दिल्या तसेच थायलंड येथून आलेले PEITA सदस्य तथा माजी राजदूत थाराडोल थाँगग्रंग आणि पिटा सदस्य नरेन पियासच्चादेश यांना देखील शुभेच्छा दिल्या. या समिटमध्ये विविध व्यवसायिकांच्या पॅनल डिस्कशन साठी मॉडरेटर म्हणून काम पाहणाऱ्या सुप्रसिद्ध पत्रकार महेश म्हात्रे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे असिस्टंट एडिटर चित्तरंजन टेंभेकर यांचे देखील आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले. यू बिझनेस मिट चे फाउंडर वैभव सोनटक्के आणि को फाउंडर रवींद्र प्रताप गुप्ता,पत्रकार मंदार दोंदे, पत्रकार विवेक पाटील, समृद्धी वाणी यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई ग्लोबल समिट चे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *