मुकुंद रांजणे (माथेरान)
माथेरानच्या निसर्गावर निस्सीम प्रेम असणारे भूमिपुत्र राकेश कोकळे यांनी मागील काही वर्षांपासून येथील प्लास्टिक कचरा गोळा करून तो नगरपालिका मध्ये जमा करत असतात. पर्यावरण प्रेमी अवलिया अशीच ओळख निर्माण करून आजपर्यंत गावातील बहुतेक ठिकाणी आपल्या मित्र परिवार सोबत जाऊन वेळप्रसंगी कड्याकपारीत स्वतः उतरून प्लास्टिक बाटल्या, रपेर्स, तसेच अन्य प्लास्टिक जन्य कचरा नियमितपणे गोण्यांमध्ये संकलन करून नगरपालिका सफाई कामगार यांच्या मार्फत योग्य स्थळी हलविण्यात येत आहे. त्यांच्या या निस्सीम कार्याची दखल घेऊन गोवा येथील
लायन्स इंटरनॅशनल यांच्या वतीने माथेरानचे स्वच्छतादूत तथा धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश विलास कोकळे यांचा १९ रोजी गोवा राज्यात स्वच्छतेच्या कार्याबद्दल विशेष सत्कार पद्मश्री पुरस्कार विजेते तसेच एक्स BARC शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शरद काळे तसेच लायन्स क्लबचे मुर्तुजा ताहेर माथेरानवाला यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राकेश कोकळे हा एक ध्येयवेडा असून त्याचा स्वच्छता बाबतीत खूपच कटाक्ष आहे. प्रत्येक पॉईंट्स वर जाऊन तेथील जंगल भागातील परिसराची पाहणी करून जेवढ्या प्रमाणात प्लास्टिक जन्य कचरा असेल तो गोळा करण्यासाठी आपल्या मित्र परिवार सोबत नेहमीच तत्पर असतो त्याच्या या निस्वार्थ कृतीचा सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
००००००००००
