कल्याण: विद्या प्रसारक मंडळाचे आर झेड शाह महाविद्यालात मोठ्या दिमाखात वार्षिक दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरली. तसेच मुबई विद्यापीठाचे डी.एल.एल.इ प्रमुख प्रोफेसर बळीराम गायकवाड यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
संस्थेचे चेअरमन तसेच दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष रमेश चीनीवर यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. महाविद्यालयाच्या परीक्षा प्रमुख डॉ. सुजाता गुडी यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचा रिपोर्ट सादर करण्यात आला. यावेळी संस्थेचे ट्रेझरर प्रमोद मुलगुंड, सेक्रेटरी दत्तात्रय मुळे, सदस्य अजित देशपांडे तसेच कुलसचिव मंगेश कोरडे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या द्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणाने संबोधित करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालाच्या वार्षिक पत्रिकेचा वितरण सोहळा पार पडला.
महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान तसेच विविध शाखांमधून सर्वोच्च अंक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणांच्या करकमलाने मुंबई विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. दीक्षांत सोहळ्यात उपस्थित सर्व प्राध्यापकवर्ग, उप प्राचार्य अन्जेनिका उदय, विलास महाजन, प्रा. राजश्री प्रभू, प्रा.युवराज वाघ, प्रा.प्रतिभा जितेश, डॉ. ओम देवानी, प्रा. प्राची रावराणे तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग सर्व विद्यार्थी तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे कार्यक्रमात सहभागी व्यक्तींच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे कुलसचिव मंगेश कोरडे तसेच डॉ. ज्योती थोरात यांच्या द्वारे करण्यात आले.
०००००००००००००
