अशोक गायकवाड
मुंबई : महाराष्ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्मुंबई महानगरपालिका आज मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत २६ मेला सकाळी ११ वाजता धारावी व सायन येथे होणार आहे. . मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घडी व महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत धारावी येथील एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र येथे तसेच ११.३० वाजता सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय येथे अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते क्षयरूग्णांना पोषण आहार किटचे वाटप देखील करण्यात येणार आहे.
