कल्याण : ईशा नेत्रालयातर्फे मायोपिया अवेअरनेस वीक २०२६ निमित्त “समर किड्स फन इव्हेंट” चे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम विशाखा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. पुष्पांजली यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व नेतृत्व मानसी विशे यांनी केले. ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्व सहभागी मुलांची बाल नेत्रतज्ज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमात डॉ. सिद्धार्थ वोरा यांनी मायोपिया जागरूकता विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. पालकांना मुलांच्या डोळ्यांची काळजी, स्क्रीन टाइमचे दुष्परिणाम आणि नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सर्व मुलांना ड्रॉइंग किट्स देण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी कुटुंबाला कॉम्प्लिमेंटरी जेल आय मास्क भेट देण्यात आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला पालक व मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बाल नेत्र आरोग्य जनजागृतीसाठी हा उपक्रम विशेष ठरला.
0000000000
