दरेकर अभ्यास गटाच्या शिफारशीच्या अंमलबजावणीबाबत दरेकरांची मुंबई महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा
राजेंद्र साळसकर
मुंबई : दरेकर समितीच्या अहवालातील शिफारशी बाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची दरेकर समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली व चर्चा केली. यावेळी मुंबईत स्वयं पुनर्विकासाला मोठी मागणी असून मुंबई महापालिकेने दरेकर समितीच्या अहवालातील मुंबई महापालिकेशी संबंधित केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी विनंती दरेकर यांनी यावेळी केली.
स्वयं पुनर्विकास प्रकल्पांना बांधकाम परवानगी आणि अन्य परवानग्या देण्यासाठी ब्लॉकचेन आधारित एक खिडकी योजना, १० टक्के अधिकचे. चटई क्षेत्र अनुज्ञेय करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, स्वयं पुनर्विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रिमियम दरात १० टक्के सवलत, स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना प्रिमियमची रक्कम भरण्यासाठी ५ टप्पे पाडून देणे आणि त्यावरील व्याज माफ करणे, ९ मीटर पेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यालगतच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ९ मीटरसाठी लागू असलेले हस्तांतरणीय विकास हक्क व शासकीय एफएसआय उपलब्ध करणे, खाजगी अभिन्यासातील रस्ते आणि राईट ऑफ वेचे रस्ते महापालिकेने स्वत:कडे हस्तांतरित करुन ते सार्वजनिक रस्ते म्हणून घोषित करणे, एलयुसी टॅक्समध्ये सवलत देण्यात देणे, अशा अनेक शिफारशींवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *