मुंबई : बाल गोपाळ मित्र मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमाने काळेवाडी-काळाचौकी परिसरात कॅरमप्रेमी स्व. दशरथ चव्हाण स्मृती बाल गोपाळ-आयडियल कॅरम सेंटरचा शुभारंभ शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे, क्रीडाप्रेमी सुनिल नागवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर उपक्रमाला परिसरातील शालेय मुलामुलींचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.
आयडियल शालेय क्रीडा चळवळीमधील कॅरम खेळासाठी नवोदित कॅरमपटूचा सहभाग वाढविण्यासाठी गेली दशकभर विविध मोफत कॅरम उपक्रमाद्वारे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयडियल ग्रुप कार्यरत आहे. शालेय डीएसओ कॅरम स्पर्धेत चँम्पियन कॅरम बोर्डवर खेळण्याचा सराव नसल्यामुळे बहुतांश शालेय खेळाडूंना यथोचित कामगिरी करतांना अडचणी निर्माण होतात. म्हणून विख्यात राष्ट्रीय कॅरमपटू सुहास कांबळी यांनी पुण्यात स्थायिक होण्यापूर्वी केलेल्या मार्गदर्शनाची मोफत कॅरम सेंटर माध्यमातून पूर्तता करण्याचा आयडियल ग्रुपचा मानस आहे. कॅरम सेंटरप्रसंगी शालेय मुलामुलींना मार्गदर्शक सचिन शिंदे यांनी प्राथमिक सराव कसा करावा, स्ट्रायकरवर नियंत्रण, बोटांची पकड, कॅरम खेळताना बसण्याची पद्धत आदीबाबत माहिती दिली तर आयडियल ग्रुपचे प्रमुख लीलाधर प्रमुख नियमांची माहिती दिली.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *