मुकुंद रांजाणे
माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या पेमास्टर उद्यानात विद्यमान नगरसेविका लता ढेबे यांच्या माध्यमातून  स्वखर्चाने विविध प्रकारच्या फुलांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.माथेरान मधील सर्वात उंच ठिकाणी हे उद्यान असून काही वर्षांपासून इथे फुलांची झाडे नाहीत. अनेकदा नगरपरिषदेच्या कार्यालयात रोपे पुरविण्याबाबतीत कळविण्यात आलेले असताना अद्यापही काहीच हालचाली दिसत नाहीत. अखेरीस नगरसेविका लता ढेबे यांनी गुलाब, जास्वंद, पिंपळ, बेल अशाप्रकारे विविध रोपे आणून स्वतः रोपण केले आहे. या उद्यानात पर्यटक विश्रांतीसाठी येत असतात. त्यासाठी हे उद्यान कायमस्वरूपी विविध फुलांच्या सुगंधांनी बहरलेले असावे जेणेकरून पर्यटकांना आकर्षित करू शकेल.यासाठी संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *