अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा २०२६
मुंबई, ३० मे: हरियाणाच्या हर्षल राणा आणि दिल्लीच्या देवश्री अरोराने अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत अनुक्रमे १७ वर्षांखालील मुले आणि मुली गटाचे विजेतेपद पटकावले. वांद्रे पश्चिम येथील ऑटर्स क्लबच्या स्क्वॉश कोर्टमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत शनिवारी ज्युनियर राष्ट्रीय गतविजेता हर्षलने महाराष्ट्राच्या अगस्त्य राजपूतवर चुरशीच्या लढतीत ११-६, ६-११, ११-१, ९-११, ११-९ असा विजय मिळवला. मुलींच्या फायनलमध्ये देवश्रीने महाराष्ट्राच्या वसुंधरा नांगरेवर ११-४, ६-११, ११-७, ९-११, ११-८ अशी मात केली.
१५ वर्षांखालील मुली आणि मुले गटात आशी शाह आणि फरीद अंद्राबी, १३ वर्षांखालील मुली गटात अक्षरा माखिजा आणि रिदान गुप्ता तसेच ११ वर्षांखालील मुली गटात समीक्षा सुगुमर आणि वेदांत शिंदेने विजेतेपदाला गवसणी घातली.
निकाल (अंतिम फेरी) : ११ वर्षांखालील मुली: समीक्षा सुगुमर विजयी वि. गौरवी अजमेरा १२-१०, ११-५, ११-७. मुले: वेदांत शिंदे विजयी वि. अगस्त्य उप्पल ११-६, ११-४, ११-७.
१३ वर्षांखालील मुली: अक्षरा माखिजा विजयी वि. श्रिया माहेश्वरी ११-७, ९-११, ११-४, १५-१३. मुले: रिदान गुप्ता विजयी वि. झेन अली ११-३, ११-७, ११-६.
१५ वर्षांखालील मुली: आशी शाह विजयी वि. नंदिकाश्री कलावनन ११-९, ११-२, ११-९. मुले: फरीद अंद्राबी बीटी विनय शिंदे १४-१२, ११-३, ११-६.
१७ वर्षांखालील मुली: देवश्री अरोरा विजयी वि. वसुंधरा नांगरे ११-४, ६-११, ११-७, ९-११, ११-८. मुले: हर्षल राणा विजयी अगस्त्य राजपूत ११-६, ६-११, ११-१, ९-११, ११-९.
