लोकहिताच्या सामाजिक सुधारणा प्राधान्याने राबविणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ०००००००
