उल्हासनगरातील जौनपूर समुदाय आणि समर्थकांना भेटणार
सुनिल इंगळे
उल्हासनगर  : उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध माजी खासदार आणि बाहुबली नेते धनंजय सिंह आणि कल्याण युवासेनेचे लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांच्या सदिच्छा भेटीनंतर उल्हासनगरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा तीव्र झाली आहे.
कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांनी उत्तर प्रदेशचे माजी खासदार धनंजय सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी चहापानी दरम्यान विविध सामाजिक व जनहितार्थ विषयांवर चर्चा झाली. या भेटीदरम्यान धनंजय सिंह यांनी जौनपूर भागातील रहिवासी आणि त्यांच्या समर्थकांना भेटण्यासाठी तसेच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी लवकरच ते उल्हासनगरला भेट देणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख प्रमोद पांडेय, शिवसेना वैद्यकीय शहर समन्वयक बिपिन सिंह, शाखा प्रमुख सुमित सिंग आणि समाजसेवक राजेश यादव हे देखील उपस्थित होते. जनसंपर्क, संघटना आणि समाजहित या विषयांवरील चर्चा अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी होती. युवा नेते हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांनी उत्तर प्रदेशचे माजी खासदार धनंजय सिंह यांच्या सदिच्छा भेटीनंतर उल्हासनगरात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. धनंजय सिंह लवकरच उल्हासनगरमध्ये शक्ति प्रदर्शन दाखवणार असल्याचे बोलले जात आहे,
धनंजय सिंह यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत उत्तर भारतीय समाजात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सामाजिक ऐक्य आणि जनसंपर्काच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो बोलले जात आहे. आता धनंजय सिंह यांचा उल्हासनगरचा प्रस्तावित दौरा केव्हा होतो आणि त्याचा स्थानिक सामाजिक व राजकीय समीकरणांवर कितपत परिणाम होईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *