मुंबई-वंदे मातरम टीमचे राष्ट्रीय सल्लागार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  सूर्यकांत पांडुरंग मोरे यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबई येथील के. ई. एम. हॉस्पिटल परिसरात भव्य महा अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  समाजातील गरजू, रुग्णांचे नातेवाईक तसेच नागरिकांना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे  यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी वंदे मातरम टीमच्या वतीने मंगेश चिवटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यासाठी वंदे मातरम टीमच्या उपक्रमांचे कौतुक केले. सदर महा अन्नदान कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष तानाजी जाधव, राजू मामा खांकाळ, राजनभाई शिंदे महेंद्र शेडगे व उदय धनंजय पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच वंदे मातरम टीमचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *