नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणी ठेंगोडा  यांच्यातील कामगारांना पेन्शन सुरू करण्याबाबत व एचपी गॅस कंपनीतील कंत्राटी कामगारांचे वेळेवर पीएफ कायद्यानुसार पीएफ लागू करा अशी मागणी सिटूचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबर, जिल्हा सेक्रेटरी देविदास आडोळे सेक्रेटरी सतीश खैरनार, विजया टिकल यांनी केली आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा गटप्रवर्तक,शालेय पोषण आहार कर्मचारी व अंशकालीन स्त्री परिचार तसेच विविध संस्थेत काम करणारे कर्मचारी व योजना कर्मचारी हे शासनाने सुरू केलेल्या योजनेचे काम वर्षानुवर्षे करीत असून मात्र त्यांना अद्याप पीएफ लागू नसल्याने  वरील कर्मचाऱ्यांना पीएफ लागू करण्याबाबत  व नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणी ठेंगोडा  यांच्यातील कामगारांना पेन्शन सुरू करण्याबाबत व एचपी गॅस कंपनीतील कंत्राटी कामगारांचे वेळेवर पीएफ कायद्यानुसार न भरल्यामुळे तसेच इतर प्रश्नांबाबत  सिटुच्या नेतृत्वाखालीपीएफ लागू करा सिटु नाशिक येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील आयुक्त अतुल कोतकर  निवेदन देऊन चर्चा करताना सिटुचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे, जिल्हा सेक्रेटरी देविदास आडोळे, सेक्रेटरी सतीश खैरनार, विजया टिकल यांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *