मुकुंद रांजाणे
माथेरान : माथेरान मध्ये या वर्षी सतत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे त्याचा परिणाम येथील पाणीपुरवठा योजनेवर मोठ्या प्रमाणात होत आहे ज्यामुळे येथील पर्यटन धोक्यात आले आहे त्यामुळेच येथील स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांनी येथील वीज वितरण कार्यालयात कर्जत विभाग अभियंते  चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेऊन आपल्या तक्रारी दाखल केल्यानंतर हा प्रश्न लवकरच सुटणार आल्याचे त्यांनी सांगितले.
या पर्यटन हंगामामध्ये माथेरानकरांना वीज व पाणी प्रश्नाने हैराण केले आहे त्यामुळे येथे वीज वितरण केंद्र बाबत प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे,त्यामुळेच येथील नागरिकांनी कार्यालयावर मोर्चा नेण्याचे निश्चित केले होते परंतु कर्जत येथील अधिकाऱ्यांनी स्थानिकांची भेट घेत हा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे सांगत माथेरान,नेरळ करिता स्वतंत्र सब स्टेशन उपलब्ध करून देताना येथे होणारा पुरवठा पॉईंट एक वरून पॉईंट दोन करण्यात येणार असून माथेरान करिता २० किमी केबल टाकण्यात येणार असल्याने केबल नादुरुस्त प्रश्न ही मार्गी लागणार असल्याचे सांगितले तर माथेरान करांना भेडसावणारा कमी दाबाने वीज पुरवठा प्रश्न मार्गी लावण्याकरिता तातडीने चार ते पाच ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. येथील भौगोलिक स्थिती पाहता विद्युत वाहिन्यांना पक्षी,प्राणी यांच्या पासून संरक्षण मिळावे या करिता आवरणे बसविण्यास ही मान्यता मिळाली आहे,त्यामुळे लवकरच माथेरान चा वीज प्रश्न निकाली लागणार असल्याचे दिसत आहे.
यावेळी माथेरान वीज वितरण कार्यालय येथे कर्जत तालुका अभियंता चंद्रकांत केंद्रे, माथेरान अभियंता सचिन आटपाटकर,  उपनगराध्यक्ष संतोष शेलार नगरसेवक  सिताराम कुंभार, गौरांग वाघेला, प्रवीण सकपाळ, नगरसेविका अर्चना भिलारे,रिजवान शेख,कुलदीप जाधव राजेश चौधरी चंद्रकांत जाधव राजेश दळवी,भास्कर शिंदे,योगेश दळवी व माथेरान मधील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *