ठाणे, महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभाग तसेच वै. प. पू. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी (देवाची) द्वारा संचालित “वारकरी आचारसंहिता परिषद, महाराष्ट्र” याचे  संयुक्त विद्यमाने या वारकरी आचारसंहिता परिषदेचे अध्यक्ष तथा क्रांतिकारी कीर्तनकार ह.भ.प.निलेश महाराज झरेगावकर यांचा दक्षिण महाराष्ट्र दौरा १२ जून  या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने ठाणे मध्यवर्ती कारागृह हे आठवे कारागृह प्रसादिक कीर्तन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकराणी भोसले यांनी दिली. याप्रसंगी अधीक्षक राजाराम भोसले, अति.अधीक्षक कैलास भवर आदी अधिकारी उपस्थित होते.
डॉ.सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य,पुणे योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा संपन्न होत असून या दौऱ्याअंतर्गत ११ जुन  रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृह हे आठवे कारागृह प्रसादिक कीर्तन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील वर्षीही ह.भ.प. निलेश महाराज झरेगावकर यांनी महाराष्ट्रातील सर्व कारागृहांचा यशस्वी दौरा करून बंदीजनांना अध्यात्म, नैतिक मूल्ये व सामाजिक प्रबोधनाचे अमूल्य मार्गदर्शन केले होते. यावर्षीही त्यांच्या भेटीमुळे बंदीजनांना सकारात्मक प्रेरणा व संस्कारमूल्यांचा लाभ झाला आहे. ह.भ.प. निलेश महाराज झरेगावकर यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून मानवी स्वभावाचे विविध रंग व त्यातील सूक्ष्म छटांचे अतिशय सुंदर, श्रवणीय व विचारप्रवर्तक विश्लेषण बंदी बांधवांसमोर मांडले. आपल्या प्रबोधनातून त्यांनी जीवनमूल्ये, नैतिकता, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक परिवर्तन यांचे महत्त्व अधोरेखित केले. कीर्तन हे समाजप्रबोधनाचे अत्यंत प्रभावी माध्यम असून त्याद्वारे व्यक्तीच्या विचारांमध्ये व आचरणामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य असल्याचे त्यांनी आपल्या उद्बोधनातून पटवून दिले. संतपरंपरेतील विचार, आध्यात्मिक संदेश आणि प्रेरणादायी उदाहरणांद्वारे बंदी बांधवांना नवचैतन्य व आत्मविश्वास प्रदान करण्यात आला. ह.भ.प. निलेश महाराज झरेगावकर यांनी कारागृहात केलेल्या या कीर्तनाचा बंदी बांधवांच्या मनावर निश्चितच अनुकूल व सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्या वैचारिक व नैतिक जडणघडणीस हातभार लागणार आहे.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *