पालघर  : 5 मे रोजी सकाळी 6 वाजता विविध वयोगटातील नागरिकांसाठी “Run For Vote” मॅरेथॉनचे आयोजन SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत करण्यात आले आहे.

भारत निवडणुक आयोगाकडुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 हा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुषगाने पालघर जिल्हातील मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानासाठी प्रवृत्त करणे आयोगाकडील या विषयी स्थायी सुचना आदेशांची अंमलबजावणी करणे व नागरिकांमध्ये निवडणुक विषयी जनजागृती करण्यासाठी SVEEP (Systematic Voters Education Program)  जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर मोहिम राबविण्यात येत आहेत.

पालघर जिल्हयातील नागरीकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीकोणातुन दिनांक 05/05/2024 रोजी जिल्हाधिकारी, गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली, नोडल अधिकारी SVEEP आणि जिल्हा क्रिडा अधिकारी, सुहास व्हनमाने यांच्या सन्वयाद्वारे विविध वयोगटातील सर्वसामान्य नागरीकांसाठी “Run For Vote” मॅरेथॉन कार्यक्रमाचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.

मॅरेथॉन सहभाग :-

पालघर जिल्ह्यातील विविध वयोगटातील महिला / पुरुष, शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्व आस्थापनांवरील शासकीय / निमशासकीय / खाजगी नोकरीतीली अधिकारी / कर्मचारी आणि पालघर व परिसरातील कोणताही इच्छुक व्यक्ती व सर्वसामान्य नागरीक “Run For Vote” मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवू शकतो.

सहभागी होण्यासाठी नियम व अटी :

“Run For Vote” मॅरेथॉन मध्ये कोणत्याही वयोगटील स्त्री / पुरुष सहभागी होऊ शकतात, 3 कि.मी., 5 कि.मी., 10 कि.मी अशा विविध मॅरेथॉनपैकी कोणत्याही एकाच प्रकारच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *