००००००००
मालवण : भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेली सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरीचा(जलमंदीर ) आषाढ महिन्यात होणारा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी २६ जुलै रोजी होणार आहे. देवस्थान समितीच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण कोकणात आषाढ महिन्यात होणारी ही एकमेव जत्रा अशी या सातेरी देवी जलमंदिरची ख्याती आहे.
कोकण प्रांतात हे एकमेव मंदिर पाण्यात आहे. जलमंदिर अशीच या मंदिराची ख्याती आहे. सातेरी देवीच्या जत्रोत्सवाची तारीख ठरविण्यासाठी मृगनक्षत्राच्या पाचव्या दिवशी संपूर्ण गाव मंदिरात जमा होतो. शेतीची कामे सुरू करण्यापूर्वी देवीसमोर श्रीफळ ठेवून देवीला साकडे घातले जाते.तसेच आषाढ महिन्यातील जत्रेची तारीखही निश्चित केली जाते.
