कल्याण: डोंबिवली मिलापनगर एमआयडीसी निवासी मधील जीएनपी गॅलरीआ कमर्शियल कॉम्प्लेक्स जवळ एका मोठ्या नाल्याचे बांधकाम एमआयडीसी कडून सुरू करण्यात आले असून अंदाजे दहा फूट रुंदीचा आणि २०० मीटर लांबीचा हा नाला बनविला जात आहे.   अत्यंत तातडीने याचे काम आठवड्यापूर्वी सुरू करण्यात आले आहे.
जीएनपी गॅलरीआ कमर्शियल कॉम्प्लेक्स पासून ते नंदी पॅलेस हॉटेलपर्यंत हा नाला जाणार असून कल्याण शीळ रस्त्यावरील आणि पलीकडील रिजेन्सी अनंतम इत्यादी ठिकाणावरून येणारे पावसाचे पूर सदृश पाणी या नियोजित नाल्यावाटे पुढे उष्मा पेट्रोल पंप व नंदी पॅलेस हॉटेल जवळून जाणाऱ्या नाल्यात हे पावसाळी पाणी जाणार असल्याने मिलापनगर परिसरात येणारे पावसाळी पूर सदृश पाणी तेथे वळविले जाणार आहे.
हा नवीन नाल्याचे खोदकाम तातडीने आणि आता जून महिन्याच्या मध्यावर का सुरू करण्यात आले याचे कारण एमआयडीसीलाच माहिती असेल. पावसाळी पूर सदृश पाणी जवळच्या रहिवाशी क्षेत्रात येऊ नये साठी हा नाला बनविला जात असला तरी हा मोठा नाला येत्या पावसाळ्यापूर्वी तयार होईल का याबद्दल शंका निर्माण झाली आहे. जरी हे सर्व नवीन नाले एमआयडीसी कडून बनविले जात असले तरी जे जुने मोठे नाले सद्या अस्तित्वात आहेत त्यातील काही नाल्यातील गाळ, कचरा हा केडीएमसी कडून अद्याप काढला गेला नसल्याचे दिसत आहे. एकंदर पावसाळा आल्यावर घाईने प्रशासन जागे होते हे दिसत आहे. पाऊस लांबल्याने प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे. जर येत्या काही दिवसांत जर पावसाला सुरुवात झाली तर मात्र प्रशासनाची गोची होणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *