६५० किलो लेग प्रेस करून रचला नवा जागतिक विक्रम!
राजेंद्र साळसकर
मुंबई-द्द,अफाट शारिरीक ताकद आणि कधीही न डगमगणारा आत्मविश्वास यांच्या जोरावर मुंबईच्या एका १९ वर्षांच्या तरुणाने क्रीडा जगतात नवा इतिहास रचला आहे. मुंबई, महाराष्ट्रातील रुद्रप्रताप निलेश पांडे या अवघ्या १९ वर्षांच्या युवकाने शक्ती आणि सहनशीलतेचे अभूतपूर्व प्रदर्शन करत लेग प्रेसमध्ये नवा जागतिक विक्रम  प्रस्थापित केला आहे. अनेक अनुभवी खेळाडू ज्या कामगिरीचे केवळ स्वप्न पाहतात, ती कामगिरी रुद्रप्रताप याने प्रत्यक्षात करून दाखवली आहे.
*२७ सेकंदात ६५० किलो वजन!
रुद्रप्रताप याने आपल्या अद्भूत शारीरिक क्षमतेची प्रचिती देत तब्बल ६५० किलो वजनाचे लेग प्रेस मारले. विशेष म्हणजे, त्याने हे वजन केवळ २७ सेकंदांत १२ वेळा (१२ Repetitions) यशस्वीरित्या प्रेस केले. त्याच्या या थक्क करणाऱ्या कामगिरीची नोंद अधिकृत ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ म्हणून करण्यात आली असून, त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे. ‘रुद्रप्रताप पांडेने ताकद आणि सहनशक्तीचा एक नवा मानदंड (बेंचमार्क) सेट केला आहे. अवघ्या १९ व्या वर्षी एवढी प्रचंड कामगिरी करणे हे थक्क करणारे आहे. अवघ्या २७ सेकंदांत ६५० किलो वजन १२ वेळा उचलणे ही सामान्य बाब नाही. रूद्रप्रताप पांडे याने घोडपदेव येथील नाकोडाइस टॉवर मधील फिट अँड फाईन जिमचे मालक अमेय नेवगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले घेतलेल आहे. रुद्रप्रतापच्या या कामगिरीने स्ट्रेंथ स्पोर्ट्स (Strength Sports) मध्ये एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून आणि क्रीडा जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, तो आजच्या तरुणाईसाठी एक मोठा प्रेरणास्रोत बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *