ठाणे- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमात योअया वतीनेग मार्गदर्शक प्रविण धुरी आणि मनोज पटेल तसेच अॅथलेटिक प्रशिक्षण योजनेतील योग प्रशिक्षक मंगला देवरुखकर व डॉ. सुधीर देवरुखकर यांनी उपस्थितांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले. यावेळी त्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर करून सहभागींकडून प्रत्यक्ष सराव करून घेतला.
योगामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, मानसिक तणाव कमी होतो आणि जीवनशैली अधिक संतुलित व सकारात्मक बनते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहनही उपस्थितांना करण्यात आले. या कार्यक्रमास ठाणे महापालिकेच्या कबड्डी व क्रिकेट संघातील खेळाडू, ॲथलेटिक प्रशिक्षण योजनेतील खेळाडू, योजना प्रमुख अशोक आहेर, राजेंद्र मयेकर, क्रीडा समन्वयक बरकडे तसेच क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
००००००००
नगरसेवक अभिजीत पवार यांच्या योग शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अनिल ठाणेकर
ठाणे, कळवा परिसरातील पारसिक नगर येथे नगरसेवक अभिजीत पवार यांच्या माध्यमातून नागरिकांसोबत योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजसेविका ऋता आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि नागरिक उपस्थित होते
माणसाचे शरीर बळकट करण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींमुळे माणूस त्रस्त आहे बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मानव देत असून यावर मात करण्यासाठी योगा हा सर्वोत्तम उपाय आहे २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. या योग शिबिरात कळवा पारसिक नगर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . या योग शिबिरात नागरिकांना विविध योगासनांचे धडे देण्यात आले. प्रत्येक योगासनाचे शरीरासाठी असणारे फायदे देखील नागरिकांना पटवून देण्यात आले. योगा फक्त योग दिना दिवशी न करता दैनंदिन जीवनात देखील योगासन करावे असे मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले.
