– महेंद्रशेठ घरत यांनी केले पत्रकार कृष्णा पाटील यांच्या परिवाराचे सांत्वन
उलवे : उलवे नोडमधील मोरावे गावचे ज्येष्ठ नागरिक अर्जुन भोकाजी पाटील (वय- ७८) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांचे ते वडील होत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांनी शनिवारी कृष्णा पाटील यांच्या परिवाराचे सांत्वन केले. यावेळी एम.जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते.
दिवंगत अर्जुन पाटील यांनी वारकरी सांप्रदायांशी आपली नाळ जोडलेली होती. ते भजन-कीर्तनात रममाण होत असल्याने त्यांना भजन-कीर्तनद्वारेच आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज सकाळी १० ते १२ ‘गरुड पुराणा’चे वाचन दत्ता म्हात्रे करतील, तर सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत दररोज भजन सेवा असेल. त्यामुळे रविवारी दत्त प्रासादिक भजन मंडळ, गव्हाण. बुवा- देवानंद कोळी, मृदंगमणी- प्रशांत कोळी. सोमवारी श्रीपत बाबा भजन मंडळ, गव्हाण. बुवा- ज्ञानेश्वर म्हात्रे, मृदंगमणी- गौरव म्हात्रे. मंगळवारी जय भवानी प्रासादिक मंडळ, धाकटी जुई. बुवा- मोहन पाटील, वेश्वी. मृदंगमणी- यश रसाळ (दिघोडे). बुधवारी श्रीकृष्ण प्रासादिक महिला भजन मंडळ, बेलपाडा. गायिका- वर्षा ठाकूर, गीता ठाकूर. मृदंगमणी- अलंकार कडू. गुरुवारी साईराम प्रासादिक भजन मंडळ, मोहा. बुवा- राहुल कोळी, मृदंगमणी- जगन्नाथ कोळी. शुक्रवारी कुलदैवत प्रासादिक भजन मंडळ, उलवे, तरघर. बुवा- सिद्धेश पाटील, विनायक खारकर. मृदंगमणी- किरण ओवळेकर, तबलावादक- सागर मढवी. शनिवारी नादब्रम्ह साधना भजन मंडळ, खारघर (रांजणपाडा), बुवा- पंडित निवृत्तीबुवा चौधरी, मृदंगमणी- निलेश पाटील (कोपरा). रविवारी श्री एकादशी भजन मंडळ, मोरावे. बुवा- महादेव पाटील, अंकुश पाटील, दत्ता म्हात्रे. मृदंगमणी- सागर मढवी. सोमवारी गावदेवी प्रासादिक भजन मंडळ, न्हावे. बुवा- महेश पाटील, मृदंगमणी- महादेव ठाकूर हे भजन करतील. मंगळवारी उत्तरकार्य आहे. त्यानिमित्त ह.भ.प. महेश महाराज साळुंखे (पाटणोली) यांचे कीर्तन होणार आहे. यावेळी पखवाज- आदित्य पाटील, गायक- अल्पेश पाटील, विनायक पाटील आणि सहकाऱ्यांची त्यांना साथ लाभणार आहे. हे सर्व कार्यक्रम अर्जुन भवन, मोरावे येथे होणार आहेत.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *