रमेश औताडे
मुंबई: कल्याण ज्वेलर्सने, विरारमध्ये आपल्या पहिल्या शोरूमचा भव्य शुभारंभ केला.  महाराष्ट्रातील आपल्या रिटेल विस्तारातील एक मोठा टप्पा ब्रँडने गाठला आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सोहळ्यामध्ये बॉबी देओल यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.  अनेक मान्यवर पाहुणे आणि स्थानिक ग्राहक यावेळी उपस्थित होते.
रमेश कल्याणरामन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,”महाराष्ट्र नेहमीच आमच्या सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक राहिला आहे. विरारमध्ये आमचे पहिले शोरूम सुरू करून आम्ही आमचे स्थान अधिक मजबूत करत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद आहे. हा विस्तार दर्शवतो की, आम्ही या संपूर्ण परिसरातील ग्राहकांपर्यंत कल्याण ज्वेलर्सचा सर्वोत्तम अनुभव पोहोचवण्यासाठी तत्पर आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *