अयोद्धेतील कथित राम मंदिर चोरी प्रकरणी आंदोलन
कल्याण : अयोध्येतील कथित राममंदिर चोरी प्रकरणी कल्याण काँग्रेसच्या वतीने कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरा समोर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राम, लक्ष्मण सीतेच्या वेशात आंदोलनात सहभाग घेतला व हनुमान मंदिरात आरती करण्यात आली.  तर यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढत संबंधितांवर कारवाई करण्याचा मागणीचे निवेदन देण्यात आले.
देशातील 142 कोटी जनतेने जी देणगी दिली या देणगीतून हे राम मंदिर बांधण्यात आले असून त्यात करोडोंचा भ्रष्टाचार झाला आहे.  त्यासाठी नेमण्यात आलेली कमिटी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमली होती. यांची सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टीस कडून चौकशी करण्यात यावी. यामध्ये जेवढे दोषी असतील त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचप्रमाणे देशभरात जेवढी देवस्थाने आहेत त्यांची देखील चौकशी करण्याची मागणी यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्यासह इफ्तेकार खान, चंदर पांडे, रणजित डांगळे, आजम शेख, श्रेयस सिंग, रीना खांडेकर, कट्टीमणी शिवलिंगा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *