वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील २८ एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी. ) स्थापन करण्याबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच  उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले.  राणे यांनी यावेळी  एमआयडीसीबाबत मंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन, कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात प्रगत असला तरी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अजूनही खूप वाव आहे. नाधवडे परिसरातील उपलब्ध शासकीय जमीन, आवश्यक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील औद्योगिक विस्ताराची क्षमता लक्षात घेता येथे नवीन एम.आय. डी. सी. विकसित करणे गरजेचे आहे.
त्यामुळे, मौजे नाधवडे येथील शासकीय जागेवर औद्योगिक वसाहतीची  स्थापना झाल्यास सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठे प्रोत्साहन मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होईल आणि जिल्ह्यातील युवकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. तसेच सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. निवेदन देतेवेळी नाधवडेचे सुपुत्र, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *