स्वराज लाड, गीतिका सालियन तर प्रशिक्षक तुषार गीतये यांची भारतीय संघात निवड
मुंबई, प्रतिनिधी : थायलंडमधील बँकॉक येथे होणाऱ्या १२व्या आशियाई वयोगट जलतरण (अॅक्वॅटिक) अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून,ही स्पर्धा १६ ते २१ जुलै या कालावधीत बँकॉक (थायलंड) येथे होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील चार डायव्हर्स पैकी मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील दोन डायव्हर्स आणि एका प्रशिक्षकाची निवड झाली आहे. स्वराज राजेंद्र लाड याची १८ वर्षांखालील मुलांच्या गटातील ३ मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग प्रकारासाठी, तर गीतिका सालियन हिची १५ वर्षांखालील मुलींच्या गटातील प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
तसेच, विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील प्रशिक्षक तुषार गितये यांची या स्पर्धेसाठी भारतीय डायव्हिंग संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत स्वराज लाड आणि गीतिका सालियन भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, प्रशिक्षक म्हणून तुषार गितये संघास मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *