शहापूरच्या घाटघर प्रकल्पाला हिरवाईचा साजअविनाश उबाळे
ठाणे : सहयाद्री पर्वतरांगांच्या माथ्यावरुन कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे चहुबाजूंने दिसणारे हिरवेगार वृक्ष रिपरिप पडणारा पाऊस त्यात पांढऱ्या धुक्यांचा खेळ आणि संपूर्ण हिरवेगार झालेले सहयाद्रीचे डोंगर माथे आणि निसर्गाचा अद्भूत अनुभव देणारे हे ठिकाण म्हणजे शहापूर तालुक्यातील घाटघर प्रकल्पाचा परिसर डोळ्यात सामवणारा इथला निसर्ग व धबधबे तर अक्षरशः रोमांचित करणारे असे आहेत.
ठाणे जिल्हयातील शहापूर पासून ५० किलोमीटर अंतरावर डोळखांब जवळ चोंढा येथे जलविद्युत प्रकल्प जलसंपदा विभागाने सुमारे अकराशे कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी वीज प्रकल्प उभा केला आहे.संपूर्ण जपान तंत्रज्ञानाचा वापर करुन घाटघर धरणाच्या पाण्यावर अडीचशे मॅगवेट एवढी वीज येथे तयार केली जात आहे.घाटघर धरण हे अगदी निसर्गाच्या कुशीत लपलेले आहे.या परिसराचे पावसाळ्यातील देखणे रुप म्हणजे निसर्ग प्रेमींना पर्वणीच म्हणावी लागेल हा सर्व परिसर पावसाळ्यातील जून महिन्यात हिरवागार होऊन जातो उंच डोंगरमाथ्यावरुन खळखळ आवाज करत कोसळणारे येथील पांढरे शुभ्र धबधबे आणि त्यातून उंच उडणारे तुषार आणि पांढऱ्या शुभ्र गडद धुक्यामुळे काही वेळ गडब होणारे डोंगर माथे हा मिलाप तर पाहण्यासारखा  दुसरा आनंद नाही घनदाट जंगल पशुपक्षी,दुर्मिळ वन्यजीवांसाठी येथील वनराई खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे.घाटघर धरणाकडे जाणारी नागमोडी रस्ते,वृक्षांची सभोवताली रांग ,डोंगर दऱ्यांतून कोसळणाऱ्या धबधब्यांचा दूरवरून येणारा आवाज, पक्षांचा किलबिलाट हा सारा अनुभव एकदा घ्यावा असा हा घाटघर धरण परिसर आहे.घाटघर धरणाला एकूण ७ दरवाजे आहेत धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास ते सातही दरवाजे उघडतात पावसाळ्यात पडणाऱ्या धुक्यांच्या छायेत हा परिसर जणू स्वर्गीय वाटतो.पावसाळ्यांत या ठिकाणावरील हिरवेगार नयनरम्य दृश्य हे अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्ग सौंदर्य तुम्हाला चोंढे घाटघर प्रकल्पाला भेट दिल्यास अनुभवायला मिळेल अशा या हिरव्यागार परिसर सध्या हिरवाईने नटला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *