रमेश औताडे
मुंबई : उपवर्गिकरण पोलखोल परिषदेचे आयोजन रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे यांनी नाशिक येथे केले असून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे या परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा नेते रविंद्र अहिरे यांनी दिली. अनुसूचित जातीचे उपवर्गिकरण अ.ब.क.ड. करून देऊ अशी बतावणी म्हणजे थोतांड आहे. तुम्ही फक्त निळ्या सावलीत आसरा घेवू नका. तसेच फुले शाहु आंबेडकरी विचारांपासून फारकत घ्या यासाठी आहे असे त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शासकीय विश्रामगृह गोल्ड क्लब येथे दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे बैठकीला बागडे सर संबोधित करणार आहेत . करिता कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रवींद्र अहिरे यांनी केले आहे.
