ठाणे : चेंदणी कोळीवाडा कोळी समाज ट्रस्ट, ठाणे आणि श्री आनंद भारती समाज, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २५ जुलैदरम्यान चेंदणी कोळीवाडा येथील श्री विठ्ठल मंदिर, ठाणे (पूर्व) येथे ११६ व्या आषाढी हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाजाचे सचिव संदीप कोळी यांनी दिली. ट्रस्टचे अध्यक्ष अमरेश ठाणेकर यांनी सांगितले की, यंदाच्या वार्षिक धार्मिक उपक्रमात १९ पुरुष व १६ महिला वीणेकरी तसेच ९ पुरुष व ११ महिला भजन मंडळे सहभागी होणार आहेत.
कै. दगडूशेठ पांडू नाखवा (१८७९–१९५3) यांच्या संकल्पनेतून या सप्ताहाची परंपरा सुरू झाली. गेली ११५ वर्षे हा सप्ताह विषम वर्षी श्री दत्त मंदिर, ठाणे (पश्चिम) येथे, तर सम वर्षी श्री विठ्ठल मंदिर, ठाणे (पूर्व) येथे आयोजित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी प्रल्हाद नाखवा (९८२0१ २५0६६) यांच्याकडे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *