कुटुंबाची मदतीची मागणी
ठाणे : शहापूर तालुक्या मध्ये डोलखांब विभागतील परिसरात बुधवारी विजांच्या कडकडास पाऊस झाला गांडूळवाड येथील  बुधा धर्मा हंबीर यांच्या घरावर वीज पडून शेतकरी कुटूंबाचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी साकाळच्या सुमारास घडली. ठाणे जिल्ह्यासह डोलखांब परिसरात पाऊस सुरू होता. त्यामुळे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने. याचा फटका हंबीर कुटुंबीयांना बसला.
बुधवारी त्यांच्या घरावर वीज पडून घराचे पत्रे कौले फुटली व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली. तसेच घराच्या भिंतीलाही विजेच्या प्रवाहामुळे भगदाड पडले आहे. घरावर वीज पडताच मोठा आवाज झाला  घरामध्ये बुधा हंबीर व दोन महिला व लहान मुलं इतर सदस्य होते. घरातील एका पुरुषाला आणि दोन महिलांना विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळाली असून सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी इजा झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *