रमेश औताडे
मुंबई : बांधकाम साहित्य क्षेत्रातील अदानी सिमेंट ने मजूर ते उद्योजक या प्रेरणा सन्मान उपक्रमात बांधकाम क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवणारे मजूर ते उद्योजक असा प्रवास करणारे सुरेंदर चौहान यांचा प्रेरणा सन्मान उपक्रमात सन्मान केला. १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेंदर अधिक चांगल्या संधी आणि स्थिर भविष्यासाठी मुंबईत आले. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी मजूर आणि गवंडी म्हणून काम करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी बांधकाम तंत्र, कारागिरी आणि बांधकाम स्थळावरील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवला. कौशल्य आणि आत्मविश्वास वाढत गेल्यानंतर सुरेंदर यांनी स्वतंत्रपणे छोटे बांधकाम प्रकल्प स्वीकारण्यास सुरुवात केली.
०००००००००
