आंतरविद्यालयीन क्रीडा स्पर्धा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व एरंडोल क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगावने उल्लेखनीय कामगिरी करत “मैदानी खेळ २०२५-२६ विजेता पुरुष संघ – प्रथम पुरस्कार” तसेच “ओव्हरऑल सांघिक खेळ (पुरुष व महिला) – तृतीय विजेतेपद” पटकाविले.
यावर्षी या स्पर्धांचे यजमानपद धनदाई महाविद्यालय, अंमळनेर यांनी भूषविले होते. संपूर्ण वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या सर्व क्रीडा स्पर्धांमधील गुणांकनाच्या आधारे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. खुशाल देशमुख यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांच्या वतीने स्वीकारला. यावेळी प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील (अध्यक्ष), उपप्राचार्य डॉ. जयवंराव पाटील तसेच विभाग सचिव डॉ. शैलेश पाटील उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदके जिंकली. विविध खेळ प्रकारांमध्ये सर्वाधिक विजेते, उपविजेते, तृतीय क्रमांक तसेच उल्लेखनीय सहभाग नोंदवल्यामुळे महाविद्यालयाला मैदानी खेळ विजेता पुरुष संघ – प्रथम पुरस्कार आणि ओव्हरऑल सांघिक खेळ (पुरुष व महिला) – तृतीय विजेतेपद बहाल करण्यात आले. या यशामुळे महाविद्यालयातील सर्व खेळाडू, क्रीडा विभाग तसेच संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल, व्हाइस चेअरमन व आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चेअरमन योगेशभाऊ अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष आर. सी. आबा पाटील, उपाध्यक्ष मिलिंददादा देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कूल चेअरमन नानासो प्रदीप अहिरराव, सीनियर कॉलेज कमिटी चेअरमन सुरेशभाऊ स्वार, ज्युनिअर कॉलेज कमिटी चेअरमन नानाभाऊ कुमावत, क्रीडा समिती अध्यक्ष योगेशभाऊ करनकाळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अजय काटे व डॉ. पूनम निकम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिल मगर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, तालुका क्रीडा समन्वयक अजय देशमुख, कार्यालयीन अधीक्षक हिम्मत अंदोरे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या खेळाडूंचे व क्रीडा विभागाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
