आदिवासींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम.. दखल घेण्याची काळाची गरज…
राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील नऊआरोग्य केंद्रा पैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या म्हसा आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या आदिवासी बांधवाची पायपीट होऊ नये यासाठी शासनाने सन २०२२ मध्ये पाटगाव परिसरातील चाफेवाडी,गेटाची वाडी,बाटलीची वाडी.वाघाची वाडी अशा सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या आदिवासी बांधवांना स्थानिक ठिकाणी उपचार मिळावेत यासाठी सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून बांधलेले आरोग्य केंद्र ,गेल्या तीन वर्षांपासून धुळखात पडले असल्याने हजारो आदिवासी बांधवांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने आरोग्य विभागाचे कारभारावर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्यातील म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रात सुमारे सत्तर हजार लोकसंख्या असल्याने त्यांना छोट्या मोठ्या आजारावर उपचार घेण्यासाठी म्हसा आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लागते.त्यामुळे छोटे मोठे अपघात, सर्पदंश तसेच गर्भवती महिलांना तातडीचे उपचार वेळीच मिळत नसल्याने काहीना उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागला आहे.यावर पर्याय म्हणुन शासनाने पाटगाव परिसरातील अनेक आदिवासी वाड्या वर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांना तात्काळ उपचाराची सुविधा मिळण्यासाठी तेथे सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून प्रशस्त असे आरोग्य केंद्राची उभारणी केली.त्या ठिकाणी लाईट , पिण्याचे पाणी.तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांचे निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.तसेच त्या आरोग्य केंद्रात लागणाऱ्या मशिनरी पुरविल्या परंतु आरोग्य विभाग हे केंद्र सुरू करण्यात उदासीनता दाखवत असल्याने.सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मलेरिया टायफॉइड तसेच इतर आजारांनी डोके वर काढल्याने अनेक नागरिकांना त्याची बाधा झाली असुन ते आपल्या शेजारी मोफत उपचार मिळण्यासाठी बांधण्यात आलेले आरोग्य केंद्र धुळखात पडले असल्याने सुमारे पाच ते सात किलोमीटर ची पायपीट करून म्हसा येथे मोफत उपचारासाठी येतात,परंतु तेथे ही डॉक्टर नसल्याने खाजगी उपचार घेण्यासाठी भटकंती करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. या बाबतीत आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे..
कोट
पाटगाव येथील आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन ते तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य दोनअधिकारी यांनी वेळोवेळी वैद्यकीय अधिकारी.प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसा यांना दिलेले आहेत. त्यांनी अजुन ते सुरू का केले नाही,याचा लेखी खुलासा मागविण्यात येत आहे. —-डॉ.श्रीधर बनसोडे.तालुका आरोग्य अधिकारी.पं. समिती मुरबाड.
००००००००००
