मिरा – भाईंदर : मीरा रोडमध्ये स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक कृत्यांचे आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘एएनके लक्झरी सलून अँड स्पा’ येथे वेश्याव्यवसाय चालत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. येथील एएनके लक्झरी सलून अँड स्पा मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डिसीपी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी पिंगळे यांच्या टीमने या स्पा वर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ५ तरुणींना आणि २ ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. मसाजच्या नावाखाली हा गैरप्रकार सुरू होता अशी प्राथमिक माहिती आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
