पनवेल : नुकत्याच छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रायगडने विजेते पदाचा मान मिळवला. रायगडने या स्पर्धेत ४४ सुवर्ण, २१ रौप्य, ८ कांस्य अशी एकूण ७३ पदकांची घसघशीत कमाई केली.
सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची २१-२३ ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पदक विजेत्या खेळाडूंना थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष व रायगड थाईबॉक्सिंगचे अध्यक्ष निलेश भोसले, थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ पनवेल शहरचे अध्यक्ष प्रतिक कारंडे, उरण तालुका अध्यक्ष सुरज टकले, प्रशिक्षक – सुरेश राठोड, रोहित तळी, योगेश बैकर, सुयश पवार, वरद केणी, प्रथम बहिरा, ओम पिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. पदक विजेत्या खेळाडूंचे थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे चेअरमन डॉ. मंदार पनवेलकर, अध्यक्ष फरहान नबिजी यांनी अभिनंदन केले असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
सुवर्ण- स्नेहा राऊत, अनिकेत दुशिंग, चैत्राशी काकडे, मयूर जाधव, स्वस्तिक भोसले, फिरोज अन्सारी, ऋषिकेश कुमार, करण शिरोडकर, अनन्या पाटील, मनमय झट, वर्धन कदम, एलीजा आदाकुल्ला, मानव बहेकर, मृगाक्षी पॉल, अथर्व मसुरकर, नक्ष मोरे, श्री पवार, प्रणव कांबळे, अर्णव इंगवले, जिया मांजरेकर, आराध्या नंबियार, वंश कोकरे, श्रेयश पवार, काव्या शेजला , शुभम पवार, अर्पित पदक, दर्शित माळी, अद्विका गरगडे, पूर्वा फडके, प्रियल पानसे, प्रभास रहाटे, ए रुद्रा, आस्था भगत, लावण्य झा, सिद्धी सावंत, सार्थक भगत, दृश्यम झा, यश पाटील, श्रेयश चव्हाण, स्मीत नारंगीकर, आमन जैस्वाल, सिया कोळी , साक्षात फराड, अथर्व भोसले
रौप्य- जिजा भोसले, प्रिशा पाटील, शिवांक राणा, अविशा शिंदे, वैष्णवी सावंत, स्वामिनी शिर्के, सोहम सावंत, पल्लवी कणसे, श्रेयस कलकुटे,ओम माळी, स्वप्निल राठोड, सानवी सावंत, प्रात्विक मुंडले, अजिना मुजावर, अगस्या वैदू, आर्या लेंडवे, निष्ठा चंदाने, रयांश जाधव, विहान कालगावकर, श्रेया रहाटे, सतेज पडळकर, सम्यक कदम कांस्य- हर्षित राऊत, लक्ष किरूगवल, आरुष नायर,साई मूर्ती, विक्रांत खुटाळे, तन्वी शर्मा, रिया सेल, अदिती पवार
००००
