रायगड-अलिबाग :
(अशोक गायकवाड ) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुळे या गावातील मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची पाहणी केली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील, सदस्या मानसी दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील आदी उपस्थित होते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेतापर्यंत सहज पोहोचता येणार असून, शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देत शेतकऱ्यांच्या विकासाला गती देणारी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सरकारच्या विविध विकासकामांचा वेग वाढवून जिल्ह्यातील जनतेला अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही ते शेवटी म्हणाले.
००००००००
