अशोक गायकवाड
कर्जत : महसूल दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व महसूल दिन’ कार्यक्रमात कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन २०२५-२६ या महसूली वर्षात शासनाच्या धोरणे व उद्दिष्टांनुसार अत्युत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तिपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेंद्र दळवी, विक्रांत पाटील तसेच सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि कृषी सभापती वैकुंठ पाटील उपस्थितीत होते . प्रशासनाच्या वतीने कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, महसूल अपर आयुक्त वैशाली उंटवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदुलकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००००
