मुंबई. …नुकत्याच दक्षिण कोरिया आणि थायलंड येथे झालेल्या आंतर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ५३ वर्षीय तायक्वांदो ग्रॅंडमास्टर संतोष गुलदेकर यांनी शानदार कामगिरी करताना ३ रौप्य आणि १ कास्य पदकाची कमाई केली. कोरिया स्पर्धेत त्यांनी पुमसेमध्ये  आणि क्युरोगी प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. तर नंतर थायलंड स्पर्धेत गुलदेकर यांनी क्युरोगी प्रकारात रौप्य आणि पुमसेमध्ये कास्य पदक मिळवले. या दोन्ही स्पर्धात अंदाजे ३० देशांचे ३ हजार पेक्ष्या जास्त खेळाडू सहभागी झाले होते.
मोहन स्पोर्टस् अकादमीचे संतोष सर मुख्य प्रशिक्षक आहेत. तसेच ते ब्लॅक बेल्ट ५ डन असुन त्यांच्या या यशात गुरु स्व.मोहन सर,अदिती,आर्या,श्रेया यांचा मोठा वाटा आहे. संतोष गुलदेकर यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व थरातुन‌ खास अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *