– जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न
 दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, उपशहर प्रमुख मारुती पडळकर, विभाग प्रमुख योगेश निकम यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश
दिवा, दि.24 ऑगस्ट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवा शहरात युवा सेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील, उपशहर प्रमुख मारुती पडळकर, विभाग प्रमुख योगेश निकम यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात परिसरातील अनेक तरुणांनी पक्षप्रवेश करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी पक्षाशी निष्ठा आणि तत्त्वांशी तडजोड न करण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. “पक्षाचा आदेश हाच आपल्यासाठी अंतिम असतो. गेली चार वर्षे कोणत्याही प्रलोभनांना, आमिषांना वा दबावाला बळी न पडता, स्वाभिमानाने आणि निष्ठेने आपण सर्वजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत,” असे दिघे म्हणाले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा दाखला देत केदार दिघे पुढे म्हणाले, ज्या संघटनेने आपल्याला ओळख दिली, तिथे १०० टक्के योगदान देणे हे आपले कर्तव्य आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत भगव्याशी आणि शिवसेनेसोबत निष्ठावान राहिले. तोच विचार घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.” दिवा परिसरातील पाणी, रस्ते आणि कचऱ्याच्या मूलभूत समस्यांवर बोट ठेवत त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. तरुण पिढीच्या भविष्यासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन व नेतृत्व शहर संघटिका ज्योती पाटील, उपशहर प्रमुख मारुती पडळकर आणि विभाग प्रमुख योगेश निकम यांनी केले. या सोहळ्यास युवा जिल्हा अधिकारी स्वप्नील पावशे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, विभाग प्रमुख संजय जाधव, रवी रसाळ, हेमंत नाईक, मंगेश शेलार, उपविभाग प्रमुख संजय निकम, अजित माने, अशोक अमोंडकर तसेच शाखा प्रमुख समाधान कदम, अरुण लोकरे, धनाजी पोवार, शैलेश कदम यांसह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला सूत्र संचालन विलास मूळम यांनी केले.
यावेळी खालील कार्यकर्त्यांनी युवा सेनेत सुनील सूर्यवंशी सागर, वैभव अतुल जाधव, जयदीप विशे, प्रशांत त्रिभुवन, साहिल साळुंखे, लोकरे देवकर, ओमकार खेडेकर, निखिल कदम, प्रीतम कनोजिया, सुजल पांचाल, गणेश कदम, साहिल पांचाल, संस्कार मोरे, साहिल पवार, संदेश सुर्वे, संकेत गुंजाळ, प्रतीक पाटणकर, श्रवणकुमार मिश्रा, रोहित उभारे, वेद गुडेकर, संतोष गुंजाले, दर्शन नागवले, संदीप बादल, आशिष शेट्टी, अविनाश शिंदे, किरण मोरे, शुभम कदम, रितेश पोटे आदी युवा पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रवेश केला. तरुणांच्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे दिवा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला बळ मिळाल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसून आ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *