ठाण्यातील युवक पदाधिकाऱ्यांचा डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार गटात प्रवेश
अनिल ठाणेकर
ठाणे- ठाण्यातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गळती लागली आहे. अजित पवार गटातील ओवळा – माजीवडा विधानसभा क्षेत्राचे युवक कार्याध्यक्ष फिरोज शेख  आणि ब्लाॅक अध्यक्ष गोश्फाक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस,  आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेला अनुसरून आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व स्वीकारून मोठ्याप्रमाणात युवक पक्ष प्रवेश करू लागले आहेत. आज युवक अध्यक्ष अभिजीत पवार, युवा नेते वीरू वाघमारे यांच्या पुढाकाराने अजित पवार गटातील ओवळा – माजीवडा विधानसभा क्षेत्राचे युवक कार्याध्यक्ष फिरोज शेख  आणि ब्लाॅक अध्यक्ष गोश्फाक शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी माथाडी सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, ओबीसी सेलच्या महिलाध्यक्ष मनिषा पाटील, बिपीन गेहलोत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *