रमेश औताडे
मुंबई : केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या विचारार्थ अटी व शर्तींमध्ये १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन दुरुस्तीचा समावेश न केल्याने, देशभरातील केंद्र सरकारी पेन्शनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याविरोधात ‘रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशन’ व ‘नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशन’ च्या वतीने २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयावर विशाल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाद्वारे पेन्शन अधिनियम प्रमाणीकरण कानून तात्काळ रद्द करण्याची, आठव्या वेतन आयोगाच्या (विचारार्थ अटी) मध्ये सुधारणा करण्याची, १ जानेवारी २०२६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनर्सच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची, ५० टक्के मूळ वेतन व पेन्शनमध्ये समाविष्ट करण्याची आणि २५ टक्के अंतरिम मदत त्वरित देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या सर्व विभागांतील रेल्वे पेन्शनर्ससह केंद्र सरकारी पेन्शनधारकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जोनल अध्यक्ष एन. हरिदासन, जोनल कार्याध्यक्ष अरविंद माने आणि जोनल महामंत्री आर. के. सारस्वत यांनी केले आहे.
0000
