राजीव चंदने
मुरबाड :  कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि भारत सरकारच्या अल्मिको मुंबई व जिल्हा प्रशासन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी मोफत सहाय्यक साहित्य वाटप योजनेअंतर्गत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार ३१ ऑगस्ट, सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कुणबी समाज हॉल, मुरबाड, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथे आयोजित केले आहे. या शिबिरात केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप केले जाणार आहे. यामध्ये तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कुबड्या (काखेतील व हातातील), वॉकर, अंधांसाठी काठी, श्रवणयंत्र, कमरेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, मानेचा पट्टा, कृत्रिम हात-पाय व इतर सुमारे चोवीस प्रकारचे साहित्य समाविष्ट आहे.
शिबिरासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
अ) गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी –
१) वय साठ वर्ष पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून आधार कार्डची छायाप्रत
२) उत्पन्नाचा दाखला किंवा शिधापत्रिकेची छायाप्रत
३) पासपोर्ट आकाराचा एक फोटो
ब) दिव्यांग बांधवांसाठी –
१) दिव्यांग प्रमाणपत्राची छायाप्रत
२) आधार कार्डची छायाप्रत
३) उत्पन्नाचा दाखला किंवा शिधापत्रिकेची छायाप्रत
४) पासपोर्ट आकाराचा एक फोटो
या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी व नोंदणी करून घ्यावी आणि शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किसन कथोरे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी उल्हास बांगर ९२६०४२००७०, रामभाऊ दळवी ९२०९४०८९९९, मोहन गडगे ९९२२७०१०००, दिपक पवार ८३०८५३५२००, जितेंद्र भावार्थे ९८९०९२५०५६ यांच्याशी सम्पर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *