रमेश औताडे
मुंबई: इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सने व्यवसायातील विविध प्रक्रियांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ए आय वापर वाढविण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्सची निवड केली आहे. या तंत्रज्ञानामुळे विक्री प्रक्रिया अधिक वेगवान, कामकाज सुलभ आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. एजंटफोर्सच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद, विमा प्रस्तावांचे मूल्यांकन, ग्राहक सेवा आणि क्लेम प्रक्रियेत एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या गरजांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.
इंडियाफर्स्ट लाइफचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रुशभ गांधी यांनी सांगितले की, डिजिटल परिवर्तनामुळे विक्री प्रक्रियेत सुधारणा झाली असून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला झाला आहे. सेल्सफोर्स साऊथ एशियाचे अध्यक्ष व सीईओ अंशुमती भट्टाचार्य यांनीही एआयच्या मदतीने विमा व्यवसाय अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *