काजल कुमारी – महम्मद घुफ्रानला प्रथम मानांकन

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला यंदाच्या वर्षी ७० वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब ( क्षात्रैक्य समाज, मुंबई ) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅरमची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनमाळी हॉल, दादर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ४ मेला सकाळी ९ वाजता पुरुष एकेरी गटाने स्पर्धेला प्रारंभ होत आहे. पुरुष एकेरी गटात ३१० तर महिला एकेरी गटात ४४ खेळाडूंनी भाग घेतला असून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची या हंगामाची हि पहिली स्पर्धा आहे.

पुरुष एकेरीमध्ये मुंबईच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू महम्मद घुफ्रानला प्रथम मानांकन दिले असून महिला गटामध्ये हा मान मुंबईच्या आंतर राष्ट्रीय खेळाडू काजल कुमारीला मिळाला आहे. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे.

पुरुष एकेरी : १) महम्मद घुफ्रान ( मुंबई )  २) अभिजित त्रिपनकर ( पुणे )  ३) विकास धारिया ( मुंबई )  ४) पंकज पवार ( मुंबई )  ५) प्रशांत मोरे ( मुंबई )  ६) संदीप दिवे  ( मुंबई उपनगर )  ७) झैद फारुकी ( ठाणे )  ८) सागर वाघमारे ( पुणे ) महिला एकेरी :  १) काजल कुमारी ( मुंबई )  २) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे )  ३) अंबिका हरिथ ( मुंबई )  ४) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर )  ५) उर्मिला शेंडगे ( मुंबई ) ६) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) ७) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) ८) श्रुती सोनावणे ( पालघर )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *